सारसबाग चौपाटीचे पालटणार रूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - पुणेकरांनो, सध्या तुम्ही बघत असलेली सारसबागेची चौपाटी लवकरच नव्या रूपात तुम्हाला पाहिला मिळणार आहे. स्वच्छता, खाद्य पदार्थांचा उत्तम दर्जा, प्रत्येक पदार्थांचा मनापासून आनंद लुटता येईल, असे वातावरण आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची आदर्श पद्धत ही या नव्या रूपातील चौपाटीची वैशिष्ट्ये आहेत. 

प्रत्येक पुणेकराने सारसबागेच्या चौपाटीवर जाऊन भेळ, पाणीपुरी, पाव-भाजी याचा आस्वाद कधी ना कधी घेतलेला असतोच. पण, गेल्या काही दिवसांपासून येथील स्वच्छता आणि दुर्गंधी वाढलेली होती. 

रस्त्यावर पडलेली घोड्याची विष्ठा, जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी वाहिनीतून येणारा दुर्गंध अशी सारसबाग चौपाटीची सद्यःस्थिती असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन ‘अन्न व औषध प्रशासन’ने (एफडीए) सारसबाग चौपाटीचा चेहरा-मोहरा बदलण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. 

सारसबाग चौपाटीचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या प्रकल्पात तेथील व्यावसायिकांना सहभागी करून घेणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात त्यांची बैठक घेऊन या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येईल.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

सारसबाग चौपाटीच्या विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील वर्षभरात हे बदल करण्यात 
येतील. स्वच्छता, ग्राहकांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा 
उत्तम दर्जा यावर भर देण्यात 
येणार आहे.
- संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

काय होणार बदल?
सारसबागेच्या या परिसरात घोड्यापासून लहान मुलांच्या खेळण्यापर्यंत आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून ते वेगवेगळ्या वस्तू विक्रेत्यांपर्यंत सर्वांची येथे गर्दी असते. सध्याची ही व्यवस्था बदलण्यासाठी या चौपाटीची रचना बदलण्यापासून सुरवात केली जाणार आहे. पुण्यातील आदर्श चौपाटी कशी असावी, याचे हे एक प्रारूप म्हणून सारसबाग चौपाटी असेल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात येथील सर्व व्यावसायिकांकडे अन्नविक्रीचा परवाना असेल, याची खात्री करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातील. आरोग्याच्या सूचना देऊन प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत अन्नपदार्थ चांगल्या पद्धतीने पोचविण्याचे कौशल्य पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. 

कसे होणार बदल?
 विक्रेत्यांच्या सहभागातून होणार बदल
 त्यासाठी ‘एफडीए’ घेणार व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक
 दुकानांसमोर वाहन पार्क करण्याची सध्याची व्यवस्था बदलावी लागेल

Web Title: sarasbag chaupati changes