सारसबाग चौपाटीवर कचऱ्यासह सांडपाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - रस्त्यावर पडलेली घोड्याची विष्ठा, कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी वाहिनीतून येणारी दुर्गंधी अशी सारसबाग चौपाटीची अवस्था आहे. खाद्यपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशा हीदेखील डोकेदुखी बनल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

पुणे - रस्त्यावर पडलेली घोड्याची विष्ठा, कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी वाहिनीतून येणारी दुर्गंधी अशी सारसबाग चौपाटीची अवस्था आहे. खाद्यपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशा हीदेखील डोकेदुखी बनल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

सारसबागेत जाऊन तेथील चौपाटीवरील भेळ, पाणीपुरी, पावभाजीवर ताव मारण्याचा आनंद पुणेकर वर्षानुवर्षे घेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे सांडपाण्याची दुर्गंधी येत असून माश्‍यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर पडलेल्या घोड्याच्या विष्ठेमुळेही परिसरात घाण झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
या बाबत संतोष तावरे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. येथील खाद्यपदार्थांमुळे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील, अशी भीती वाटते. ’’

सारसबाग चौपाटी संघटनेचे हारून गुलाब बागवान म्हणाले, ‘‘चौपाटीच्या परिसरातील सांडपाणी वाहिनीचे काम आज रात्रीपासून तातडीने सुरू करण्यात येईल. त्यामुळे पुढील दोन दिवसांत येथील दुर्गंधी दूर होईल. येथील ओला कचरा महापालिकेला दिला जातो, तर कोरड्या कचऱ्याची आम्ही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावतो. स्वच्छता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात येतील.’

पुढील वर्षभरात या चौपाटीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. स्वच्छता, अन्न पदार्थांची गुणवत्ता, नेटकेपणा यावर भर देऊन सारसबाग चौपाटीचा विकास केला जाणार आहे.
- संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: sarasbag chaupati garbage dranage water