सारसबागेमधील खाऊगल्लीला "क्‍लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य सरकारने "क्‍लीन स्ट्रीट फूड हब' असा विशेष दर्जा दिला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली. 

जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्त मुंबईत आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी आणि नागपूर फुटाळा तलाव येथील खाऊ गल्लीलाही "क्‍लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा दिला आहे. त्यामुळे स्वच्छ, चविष्ट आणि अधिक दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

दोन मोबाईल फूड टेस्टिंग लॅबसाठी केंद्राकडून राज्याला 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे बापट यांनी सांगितले. ते म्हणाले, ""स्वच्छता राखणाऱ्या उपाहारगृहांना "हायजिन रेटिंग' आणि फूड फोर्टीफिकेशन लवकरच दिले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विक्रेत्यांसाठी जागृती मोहीम आखली आहे.'' स्वच्छतेचे निकष पाळणाऱ्या राज्यातील उपाहारगृहांना बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील उपाहारगृहांचाही समावेश आहे. 

Web Title: sarasbaug Clean Street Food Hub