मोठी बातमी : 'सारथी' संस्थे'बाबत राज्य सरकारचा मोठा खुलासा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

"सारथी'च्या विषयावरून सध्या मराठा समाजात तणावाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या कग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालून वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार आज पुण्यात आले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी त्यांना भेटून निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी हे स्पष्ट केले. ​

पुणे : "सारथी संस्था' कोणत्या परिस्थितीत बंद करणार नाही. कोणीही गैरसमज करून घेऊ नये,' असे ठणकावून सांगतानाच " या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम एकवेळ पुढे मागे होईल. परंतु ती दिली जाईल. एवढेच नव्हे, तर मराठा समाजातील तरुण-तरुणींना नोकऱ्या, रोजगाराची संधी कशा उपलब्ध होईल, यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत,' असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"सारथी'च्या विषयावरून सध्या मराठा समाजात तणावाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या कग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालून वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार आज पुण्यात आले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी त्यांना भेटून निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी हे स्पष्ट केले. 

वडेट्टीवार म्हणाले," दिल्ली येथे युपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जी मदत दिली जाते. ती एक वेळ पुढे मागे होईल. परंतु ती कोणत्याही परिस्थिती बंद केली जाणार नाही. चालू वर्षासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्‍यक असेल, तर पुरेशी तरतूद करण्यात येईल. याशिवाय मराठा समाजातील तरुण - तरुणींना रोजगाराची संधी कशी उपलब्ध होतील, यासाठी प्लेसमेन्ट विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागाच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात कुठे रोजगाराची संधी उपलब्ध आहेत, यांची माहिती त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"संस्थेतून कोणालाही काढलेले नाही. उलट मध्यंतरी सुमारे 80 जण स्वत:हून राजीनामा देऊन सोडून गेले आहे. त्या ठिकाणी नवीन भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत,' असे एका प्रश्‍नाला उत्तर देऊन वडेट्टीवार म्हणाले,"" विविध संस्थांची देणी देण्यासाठी तीन कोटी रुपये संस्थेला उपलब्ध करून देण्यात आले आहे. अद्याप सात कोटी देणे आहेत. तो निधी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय 38 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर करण्यात येणार आहे.'' 

पुण्यामध्ये आजपासून नवीन नियम लागू... 

"सारथी संस्था ही स्वयत्त संस्था समजून डी.आर. परिहार यांनी खर्च करताना शासनाची मंजुरी न घेता खर्च केला. "मी करेन तेच योग्य' अशी त्यांची भूमिका होती. मध्यंतरी त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने ही परिहार यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु काही मंत्र्यांनी या चौकशी समितीबद्दल आक्षेप नोंदविला. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सीताराम कुंटे यांच्याकडे पुन्हा चौकशीचे कामकाज देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करू,' असेही वडेट्टीवार एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले.  

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarathi will not stop under any circumstances said Vijay Wadettiwar