आयसोलेशन वॉर्डच भंगारात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे  - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरेशा नाहीत. याशिवाय संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास त्याचा सामना करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या रुग्णालयाकडे नाही. विशेष म्हणजे या आजाराच्या रुग्णांना विलग करण्यासाठी बांधलेली इमारत गेल्या बारा वर्षांपासून बंदच आहे.

पुणे शहर आणि परिसराने स्वाइन फ्लूच्या साथीचा उद्रेक अनुभवला आहे; तसेच डेंगी, गॅस्ट्रो, क्षयरोग यांसारख्या आजारांचे असंख्य रुग्ण शहरात आहेत. त्यांच्यावर उपचार करायचे असतील, तर त्यांना इतर रुग्णांपासून विलग (आयसोलेट) केले जाते. कॅंटोन्मेंटच्या रग्णालयात असा वॉर्डच नाही.

याबाबत चौकशी केली असता, हा विभाग बंद करून बारा वर्षे झाल्याचे सांगण्यात आले. त्याचे सबळ कारण मात्र कुणालाही सांगता येत नाही. या आजाराचे रुग्ण आल्यास त्याला दाखल करून न घेता नायडू रुग्णालयात पाठविले जाते.

गेल्या महिन्यात एका तरुणीचे या रुग्णालयात निधन झाले होते. तिलाही क्षयरोग झाला होता.

साथीच्या आजारावरील आवश्‍यक विशेष वॉर्डच्या अभावामुळे त्या तरुणीवर उपचार करता आले नसल्याचेही सांगितले जाते. आयसीयू, उच्च प्रतीच्या चाचण्यांसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच साथीच्या आजाराचा वेगळा वॉर्ड रुग्णालयात हवाच, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इमारतीची पडझड
साथीच्या आजाराचे रुग्ण इतरांपासून दूर ठेवण्यासाठी एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. गोळीबार मैदानाजवळील कॅनॉललगत दोन मजली इमारतीत हा वॉर्ड होता. आता त्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. काही भागाची पडझड झाली आहे. रुग्णालय आणि बोर्डाचे भंगार साठविण्यासाठी या इमारतीचा वापर होत आहे. एकीकडे रुग्णालयात रुग्णांच्या खाटा वाढविण्यासाठी जागा नसताना ही इमारत मात्र वापराविना पडून आहे.

आयसोलेशन वॉर्ड खूप वर्षांपासून बंद आहे. कारण आता त्याची गरज राहिलेली नाही. प्लेग आणि कॉलरा या आजारांसाठी हे वॉर्ड सुरू केले जात असत. आता ते आजारच राहिलेले नाहीत म्हणून तो बंद केला आहे. स्वाइन फ्लू हा आताचा आजार आहे. त्या आजारावर आम्ही उपचार करू शकत नाही. कारण आमच्याकडे त्यासाठी यंत्रणा नाही. तरीही लोकांची मागणी असल्याने हा वॉर्ड सुरू करण्याबाबत बोर्डाच्या बैठकीत सूचना मांडली जाईल.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: Sardar Vallabhbhai patel hospital issue