सावरगाव आरोग्य केंद्राला द्वितीय क्रमांकाचा मान

दत्ता म्हसकर
बुधवार, 11 एप्रिल 2018

जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य व  दरवर्षी जिल्ह्यात प्रथम तीन उत्कृष्ट आरोग्य केंद्रात सावरगांवचा क्रमांक असतो. या आरोग्य केंद्रात मागील तीन वर्षामधे एकूण एक हजार एक सर्वसाधारण प्रसूती व प्रसूतीपश्चात 558 गर्भनिरोधक साधन बसवण्याचे काम  झाले आहे.

जुन्नर : सावरगांव ता.जुन्नर येथील आरोग्य केंद्रास द्वितीय क्रमांकाचे डॉ. आनंदीबाई जोशी उत्कृष्ट आरोग्य केंद्राचे पारितोषिक देण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.भोर यांनी दिली.                

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेत घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाचा पन्नास हजार रुपयांचा कायाकल्प पुरस्कार देण्यात आला. सावरगांव आरोग्य केंद्राच्या  परिचारिका जयश्री जाधव व  छाया घोडे यांना उत्कृष्ट स्त्री आरोग्य अभ्यांगता या पदासाठी फ्लोरेंस नाईटींगेल पुरस्काराने गौरवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. भोर, जयश्री जाधव व छाया घोडे यांच्यासह सहकाऱ्यानी हा पुरस्कार इंदापूर तालुक्याचे आमदार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय भरणे, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष  विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते स्विकारला.

जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य व  दरवर्षी जिल्ह्यात प्रथम तीन उत्कृष्ट आरोग्य केंद्रात सावरगांवचा क्रमांक असतो. या आरोग्य केंद्रात मागील तीन वर्षामधे एकूण एक हजार एक सर्वसाधारण प्रसूती व प्रसूतीपश्चात 558 गर्भनिरोधक साधन बसवण्याचे काम  झाले आहे. त्यामुळे सुरक्षित प्रसूती बरोबरच लोकसंख्या नियंत्रणाच्या कामातही सावरगांव आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र शासनाचे गुणवत्तेचे एन.ए.बी.एच. व एन्.क्यू.ए.एस्. हे मानांकन मिळालेली जुन्नर तालुक्यातील एकमेव आरोग्य संस्था आहे. 

Web Title: Sargaon Health Center got Second prize