राजाने कर्तृत्ववान सरदाराचा सन्मान राखला पाहिजे, वसंत मोरेंना पाठवलेल्या पत्राची चर्चा

Raj Thackeray News, Vasant More News
Raj Thackeray News, Vasant More Newsesakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची रविवारी सभा पार पडली. यात त्यांनी अयोध्या दौरा का स्थगित केला या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सभेनंतर पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. (Vasant More Letter)

राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या भूमिकेवर मोरेंनी सुरुवातीच्या काळात नाराजी दाखवली होती. शिवतिर्थ वरून आदेश आल्यानंतर त्यांनी विरोध दर्शवल्याने पुणे शहराध्यक्ष पदावरून त्यांना बाजूला करण्यात आलं. यानंरही मोरेंची पक्षांतर्गत कुचंबणा होत असल्याची चर्चा आहे. (Vasant More Latest News)

राज ठाकरे पुण्यात सभेसाठी आल्यानंतर मोरेंनी त्यांची वेळ मागितली होती. मात्र, ठाकरे न भेटताच निघून गेले. त्यामुळे पुन्हा दोघांमधील धुसफूस पुन्हा समोर आली. पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत सततचे खटके उडत असल्याने निवडणुकीआधीच मनसेत अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. अशातच आता वसंत मोरे यांना आलेले एक पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांनी वसंत मोरे यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं. मोरेंनी त्यांच्या सोशल ट्वीटरवर शेअर केलंय. पत्र समोर आल्यानंतर त्यामधील मजकुरामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या पत्रात सरहज संस्थेच्या संजय नहार यांनी मोरेंचं कौतुक केलंय. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर ते अप्रत्यक्षपणे बोलले आहेत.

पक्षासाठी वसंत मोरे यांच्यासारखा कर्तृत्ववान सरदार महत्वाचा असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com