पिंपळगावच्या महिला सरपंचाने मध्यरात्री केले धाडस अन्...

walse.jpg
walse.jpg

मंचर : पिंपळगाव-खडकी (ता आंबेगाव) येथील रविवारी (ता.३१) मध्यरात्री बेकायदा वाळूचा उपसा प्रकार सरपंच अश्विनी बांगर यांच्या जागरूकतेमुळे व धाडसामुळे उघडकीस आला आहे. महसूल खात्याने दिरंगाई दाखवून बघ्याची भूमिका घेतली. मंचर पोलिस ताबोडतोब घटनास्थळी गेले. पण पोलिसांची चाहूल लागताच आठ ते नऊ वाळू माफिया तेथून पळून गेले. दोन ब्रास वाळूसाठा, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, दोन मोटारसायकल आदी तीस लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेली वाहने घोडेगाव तहसील कार्यालयात नेण्यात आली आहेत.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्वेला पिंपळगाव हद्दीत लिंबाच्या मळ्यातील ओढ्याच्या पात्रात अनेक वाहनांचे दिवे दिसले व आवज हि येत होता. तेथून जवळच राहणाऱ्या सरपंच अश्विनी बांगर व त्यांचे पती अरुण बांगर यांना जाग आली. दोघे मोटारसायकलहून ओढ्याजवळ जावून अंधारातच थांबले. त्यांनी हा प्रकार कामगार तलाठी नंदाराम आदक, महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना कळविला. पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे व पोलीस पथक ताबोडतोब घटनास्थळी आले. पोलिसांची गाडी पाहून वाळू चोरटे अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. 

"तहसीलदार रमा जोशी यांनी मोबाईल उचलला नाही. तसेच रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचा फोन हि मला आला नाही.  आदक सकाळी सहा वाजता पंचनाम्यासाठी आले." अशी माहिती सरपंच अश्विनी बांगर यांनी दिली.

जेसीबी (एमएच १२ ईबी १४०),  ट्रक (एमएच १२ केपी ४७३१), दोन दुचाकी (एमएच १२ सीएन ९५१२ व एमएच १२ डीपी ६२७) व ट्रॅक्टर (नंबर नसलेला ट्रॅक्टर) यांचा पंचनामा कामगार तलाठी यांनी केला. विशेष म्हणजे पंचनामा झाल्यानंतर तलाठी यांच्या उपस्थित एक दुचाकी मोटरसायकल (एमएच १२ डीपी ६२७) अज्ञात इसमाने तेथून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचनामा पोलीस हवालदार सागर गायकवाड, आदक, पोलीस पाटील बबुषा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

तब्बल एक महिन्यापासून येथे रात्रीच्या वेळी वाळू चोरी वारंवार होत असतानाही महसूल विभागाला याचा थांगपत्ता नसल्याबद्दल आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, "महिला सरपंचांनी धाडस दाखवून वाळू चोरून नेणारी वाहने पकडून दिली. पण तहसीलदार यांनी मध्यरात्री आलेला मिस्ड कॉल पाहून हि सरपंच यांना परत फोन करण्याचे सौजन्य दाखविले नाही. सर्वच प्रकार संशयास्पद आहे." दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात महसूल खात्याच्यावतीने फिर्याद देण्यासाठी कोणीही आले नव्हते. अशी माहिती मंचर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com