कचरा रोखण्यासाठी सरपंचांनी स्वखर्चाने नेमले सुरक्षारक्षक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

कचरा रस्त्यावर पडू नये, गावात साथीचे आजार पसरू नयेत, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून मारुंजी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम समीर बुचडे यांनी पुढाकार घेतला असून, स्वखर्चाने २४ तास सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. कचऱ्याचे ढीग जमा होत असलेल्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक तैनात असून, कचरा टाकण्यास आलेल्या लोकांचे ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे चांगले परिणाम हळूहळू दिसत आहेत.

हिंजवडी - कचरा रस्त्यावर पडू नये, गावात साथीचे आजार पसरू नयेत, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून मारुंजी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम समीर बुचडे यांनी पुढाकार घेतला असून, स्वखर्चाने २४ तास सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. कचऱ्याचे ढीग जमा होत असलेल्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक तैनात असून, कचरा टाकण्यास आलेल्या लोकांचे ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे चांगले परिणाम हळूहळू दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण होणारे कचरा, सांडपाणी, पिण्याचे पाणी यांसह रस्ते असे मूलभूत प्रश्‍न स्थानिक ग्रामपंचायतींना डोकेदुखी ठरत आहेत. आयटी पार्कच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहेत. हिंजवडी आयटीमुळे आता माण मारुंजी, नेरे, दत्तवाडी, जांबे आदी गावांमध्ये लोकसंख्या वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यावर येथील ग्रामपंचायतीवर मोठा ताण येत आहे.

पुणे : डल्ला'बाज टोळीपासून सावधान; अशी केली जातेय हातचलाखी

सर्व रस्त्यांवर कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट दिले जाते. मारुंजी ग्रामपंचायतीनेही असेच कंत्राट दिले आहे. परंतु रोजच्या रोज कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. या प्रश्‍नाचा निकाल लावण्यासाठी सरपंच बुचडे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

त्या म्हणाल्या, की आमच्या ग्रामपंचायतीने सांडपाणी गटार वाहिनी, काँक्रीटचे रस्ते, सुसज्ज पथदिवे, गाव सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणले आहे. परंतु जागे अभावी घनकचरा प्रकल्प करता येत नसल्याने कचरा समस्या डोकेदुखी बनली आहे. त्याचे वर्गीकरण करून कंत्राटदार विलेवाट लावतो. मात्र अनेक जण रात्री अपरात्री रस्त्यावर कचरा टाकून निघून जातात. हे प्रकार रोखण्यासाठी स्वखर्चाने सुरक्षारक्षक नेमले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch have appointed security guards to prevent waste