वंशाला दिवा पाहिजे म्हणून सरपंच महिलेला सासरच्यांकडून छळ

crime
crime

नसरापूर (पुणे) : वंशाला मुलगा हवा, यासाठी भोर तालुक्यातील आळंदे येथील सरपंच महिलेला तिचे पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेचा पती यांनी नसबंदी शस्त्रक्रिया खोलण्यास सांगून त्यासाठी हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा राजगड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

आळंदे गावच्या विद्यमान महिला सरपंच वनिता रविंद्र नांदे (वय 39) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांना 17 वर्षाची एक मुलगी असून, 13 वर्षाचा एक मुलगा होता. मात्र, 22 सप्टेंबर 2019 रोजी ट्रॅक्टर चालवावयास दिला व तो पलटी होऊन अपघातात मुलाचा मृ्त्यू झाला होता. त्यानंतर वंशाला मुलगा हवा म्हणून त्यांचे पती रवींद्र, सासरे काशिनाथ सोपाना नांदे, सासू सावित्रा काशिनाथ नांदे, नणंद जयश्री मोहन नेवसे, नणंदेचे पती मोहन किसन नेवसे यांनी वनिता यांना नसबंदीची शस्त्रक्रिया पुन्हा खोलण्यास सांगून त्रास द्यायला सुरुवात केली. पती समवेत त्या एकदा डाॅक्टरांकडे गेल्या होत्या. मात्र, डाॅक्टरांनी तुमच्या जीवाला धोका होईल असे करू नका, असे सांगितले होते. तरी तसे करण्यासाठी पतीसह सासरची माणसे वनिता यांना 22 सप्टेंबर 2019 पासून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

याबाबत राजगड पोलिसांनी कौटुंबिक छळ, धमकावणे व मारहाण करण्याबाबत वनिता नांदे यांचे पती रवींद्र, सासरे काशिनाथ नांदे, सासू सावित्रा नांदे, नणंद जयश्री नेवसे व नणंदेचे पती मोहन नेवसे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास सहायक फौजदार ए. बी. खोमणे हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com