संभाजीराजेंचे उपोषण मागे; सारथीची स्वायत्तता कायम राहणार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेतल्याच्या निषेधार्थ खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आगरकर रस्त्यावर लक्षणीक उपोषण केले. 

पुणे : ''सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहिली पाहिजे, जे. पी. गुप्ता यांचे आदेश मागे घेण्यात यावेत आणि निधीची कमतरता पडू नये अशा प्रमुख मागण्या मान्य झाल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज (शनिवार) सकाळी सुरु केलेले उपोषण मागे घेतले. 

सारथी बचाव : खासदार छत्रपती संभाजीराजेंचे पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु
 

मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेतल्याच्या निषेधार्थ खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आगरकर रस्त्यावर आज लाक्षणिक उपोषण केले. 

Video : 'सारथी बचाव'; छत्रपती संभाजीराजेंच्या हाकेला एकवटले मराठा तरुण

मराठा आणि कुणबी समाजातील असंख्य तरुण आणि विद्यार्थीही या उपोषणाला बसले होते. संस्थेवरील निर्बंध तातडीने उठवावेत, स्वायत्तता बहाल करावी आणि निर्बंध लादणाऱ्या सचिव जे. पी. गुप्ता यांना निलंबित करावे, अशी मागणी तरुण करीत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image

संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे देखील उपोषणासाठी आले होते. डी. आर. परिहार यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांना काम कायम ठेवण्यास सांगितले आहे. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्यात आल्याचे, एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Image

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
संभाजीराजे म्हणाले, की आमच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन याप्रकरणी सारथीची स्वायत्तता कायम राहील असे सांगितले आहे. जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटविण्यात आलेले आहे. तसेच त्यांनी काढलेले जीआरही रद्द करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarthi autonomy will remain due to Protest of Chhatrapati Sambhaji Raje