युथ एक्सचेंज प्रोग्राम 2018-19 रशियासाठी महाराष्ट्रातून पुण्याच्या सर्वेश नावंदेची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावर एअर विंग मध्ये सर्वोत्तम कॅडेट म्हणून यापूर्वी सर्वेश ची निवड झाली होती. या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून निवड झालेला सर्वेश हा एकमेव युवक आहे.

पुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात आली आहे. यात पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे या युवकाची निवड करण्यात आली आहे. देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावर एअर विंग मध्ये सर्वोत्तम कॅडेट म्हणून यापूर्वी सर्वेश ची निवड झाली होती. या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून निवड झालेला सर्वेश हा एकमेव युवक आहे.

18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यत हा दौरा रशिया या देशात असणार आहे.
सर्वेश 19 वर्षाचा असून तो मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड, पुणे येथे बी.एस.सी तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याचे 1 ली ते 12 पर्यंतचे शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कुल पुणे येथे झाले आहे,

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने  पंतप्रधान रॅली मध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे 26 जानेवारी 2018 ला सहभागी झाला होता. यास भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले  होते. त्या गुणवत्तेवरून आज त्याचे भारत व रशिया या दोन देशातील युवकांना युथ एक्सचेंज प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

भारत रशिया युवक आदान प्रदान कार्यक्रमाविषयी अधिक माहिती
भारत आणि रशियाचे आंतरराष्ट्रीय संबंध जुने आहेत, ते आणखी दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाची भूमिका बजावतो. या कार्यक्रमातून दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदान केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील रशियन तंत्रज्ञान अद्ययावत आणि सक्षम आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याची भारतीय संरक्षण यंत्रणेत उपयोग करता येऊ शकतो का याचा अभ्यास करण्यासाठी या तरुणांना या अभ्यास दौऱ्यासाठी भारताच्या वतीने पाठवले जाते. या प्रोग्रामसाठी भारतातून 25 युवकांचीनिवड झाली त्यात महाराष्ट्रातून सर्वेश एकमेव युवक आहे. 
 

sarvesh navande

सध्या याबाबत सर्वेश पूर्व प्रशिक्षण साठी करिअप्पा परेड ग्राउंड दिल्ली येथे सराव करीत आहे. दि.18 ऑगस्ट ला पूर्ण 25 जणांचा संघ रशिया येथे रवाना होणार आहे. त्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. विनोद तावडे, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राज्याचे राष्ट्रीय छात्र सेनाचे प्रमुख अॅडीशनल डायरेक्टर जनरल युद्ध सेवा मेडल व विशेष सेवा मेडल असलेले  गजेंद्र प्रसाद, राज्याचे एन सी सी चे संचालक कमोडोर श्री बालकृष्णन, निवृत्त ब्रिगेडियर  श्री बोधे, मॉडर्न गणेशखिंड महाविद्यालयाचे संस्था चालक श्री एकबोटे, प्राचार्य डॉ. खरात राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्री सपकाळ, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्री मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ. मिलिंद भोई, शंतनू जगदाळे,  प्रवीण निकम, श्रीमती तपस्वी गोंधळी व राज्य पुरस्कारथी विनीत मालपुरे,  खुशबू चोपडे, पूनम ढगे स्नेहल शिंदे, काजल भुसारी या सर्वांनी सर्वेशला शुभेच्छा दिल्या.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarvesh Navande Is Selected For Youth exchange program 2018 19