ससूनच्या परिचारिका आजपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पुणे - ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या अचानक बदल्या केल्याच्या निषेधार्थ उद्यापासून (सोमवार) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय परिचारिका संघटनेकडून घेण्यात आला आहे. दरम्यान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यावेतन वाढीच्या मुद्द्यावरून शिकाऊ डॉक्‍टर मागील पाच दिवसांपासून संपावर आहेत. त्यापाठोपाठ परिचारिकादेखील संपावर गेल्याने रुग्णसेवेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या, ""राज्य शासनाची 14 वैद्यकीय रुग्णालये असून, इतर कोणत्याही रुग्णालयातील परिचारिकांची बदली झाली नाही. मात्र, ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांची बदली करण्यात आली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्या आकसापोटी केल्या आहेत. संपात सुमारे सहाशे परिचारिका सहभागी होणार आहेत.''

Web Title: sasoon hospital nurse strike