
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'ओबेसिटी मिशन' या अभियानाची सुरुवात ससून सर्वोपचार रुग्णालयात शालेय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीने करण्यात आली.
Sasoon Hospital : ससून रुग्णालयात ओबेसिटी मिशनची सुरुवात
कॅन्टोन्मेंट - शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'ओबेसिटी मिशन' या अभियानाची सुरुवात ससून सर्वोपचार रुग्णालयात शालेय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीने करण्यात आली.
यावेळी एस.व्ही. युनियन प्रशाला, आगरकर प्रशाला, अत्रे दिन प्रशाला, मॉर्डन हायस्कूल मधील इयत्ता ७ वी ते ९ वी पर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात लठठ्पणाची कारणें, दुष्परिणाम व त्याचा प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. हरीश उम्रजकर, डॉ.हर्पल भितकर, डॉ. मिनल चंदनवाले, डॉ.पुनम संचेती, डॉ. चैतन्य गायकवाड, डॉ. शुभम चौधरी यांनी परिश्रम घेतले.
लठठ्पणा काटेकोर आहार व नियमित व्यायाम यामुळे टाळता येतो. याबाबतचे समुपदेशन व विशेषोपचार ससून रुग्णालयात उपलब्ध अहेत.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता,ससून रुग्णालय, पूणे
सन २०३० पर्यत जगभरातील लठठ मुलांच्या (Childhood Obesity ) भारतीयांचे प्रमाण १० टक्के असण्याची शक्यता आहे. त्यासाठी शालेय वयापासून प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
- डॉ. हरीश उम्रजकर, सहयोगी प्राध्यापक तथा नोडल ऑफिसर, ओबेसिटी मिशन ,ससून रुग्णालय पुणे