जखमी आईबरोबरच पोटातील बाळाने लढाई जिंकली ! ससूनच्या डॉक्टरांची कामगिरी

Sassoon doctor safely delivered the complicated sugary of pregnant woman  baby injured accident
Sassoon doctor safely delivered the complicated sugary of pregnant woman baby injured accident

पुणे  : नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. संध्याकाळचे सात वाजलेले. २१ वर्षीय गरोदर महिला दुचाकीवरून जात होती. इतक्यात नेमके काय घडले कळलेच नाही पण, क्षणार्धात ती गाडीवरून खाली रस्त्यावर पडली. पडली ती नेमकी पोटावर. त्या क्षणापासून फक्त तिचीच नाही, तर तिच्या पोटातील बाळाचीही जगण्याची लढाई सुरू झाली. ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने ही लढाई या दोघांनीही जिंकली.

पोटावर पडलेल्या गर्भवतीला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ससून सर्वोपचार रूग्णालय उपचारासाठी दाखल केले. गर्भवतीच्या पोटावर बेंबीच्या वरच्या बाजूला दोन जखमा झालेल्या. एका जखमेतून आतड्याचा भाग बाहेर आलेला. बाळाच्या हृदयाचे ठोके अजूनही ऐकू येत होते. या एकाच आशेवर रुग्णालयातील डॉक्टरांनी पटापट उपचार सुरू केले. त्यासाठी संपूर्ण युनिट सक्रिय झालेले.

सोनोग्राफीत पोटामध्ये रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेसाठी गर्भवतीला लेगच ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले. स्त्रीरोग तज्ञांनी प्रथम सिझेरीयन करून २१०० ग्राम वजनाचे बाळ आईच्या गर्भाशयातून सुरक्षीत बाहेर काढले. गर्भवतीच्या आतड्याचा बाहेर आलेला भाग डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला. पूर्ण आतडे व पोटातील इतर अवयवांची तपासणी केली. गर्भाशयाच्या पिशवीवर दोन ठिकाणी जखमा आढळून आल्या.

गर्भवती इतक्या जोरात रस्त्यावर पडली होती की, फक्त तिलाच नाही, तर पोटातील बाळाच्या कमरेवरसुद्धा दोन ठिकाणी जखमा झाल्याचे डॉक्टरांना दिसले. या शास्त्रक्रियेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा नाईक, डॉ. तेजस्विनी काळे, डॉ. स्नेहल तिनईकर, डॉ. प्रज्ञा, डॉ. अनुष्का व टीमने सहभाग घेतला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागचे प्रमुख डॉ. रमेश भोसले यांनी यात मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबतच त्या वैद्यकीय पथकात बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर, शल्यचिकित्सक डॉ. किरण जाधव, डडॉ. दयानंद, डॉ. मनोज यांचा समावेश होता.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, “रस्त्यावरील अपघातामध्ये बऱ्याच वेळा गर्भ पिशवीला गंभीर दुखापत, अतिरिक्त स्त्राव होतो. यामुळे आई व पोटातील बाळाचा जीव दगावण्याची शक्यता जास्त असते. परंतु अचूक व योग्य वेळेत निदान, उपचार व शस्त्रक्रिया यामुळे आई व पोटातील बाळ वाचविण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयातील वरील टिमला यश आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com