"ब्रेन डेड' रुग्णाच्या अवयवांमुळे दोघांना जीवनदान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - ससून रुग्णालयातून प्रथमच दान केलेल्या "ब्रेन डेड' रुग्णाच्या अवयवांमुळे दोन जणांना जीवनदान मिळाले आहे. त्यातील यकृत आणि मूत्रपिंड एकाच रुग्णावर प्रत्यारोपण करण्याची पुण्यातील दुसरी शस्त्रक्रिया शुक्रवारी पहाटे करण्यात आली. 

अपघातात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय तरुणाला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयातील विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यासाठी आवश्‍यक अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि प्रभावी औषधांचा वापर करूनही रुग्णाच्या 

शरीराने या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबले. त्यामुळे हा रुग्ण "ब्रेन डेड' असल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. 

या वेळी ससून रुग्णालयातील अर्जुन राठोड आणि एम. बी. शेळके यांनी महत्त्व पटवून दिल्याने रुग्णाचे नातेवाईक अवयव दान करण्यासाठी तयार झाले. 

हा रुग्ण तरुण असल्याने त्याचे सर्व अवयव चांगले होते. त्याचे यकृत, मूत्रपिंड, आतडे, हृदय आणि फुफ्फुस शस्त्रक्रिया करून काढण्यात आले. 

याबाबत माहिती देताना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ""अद्ययावत वैद्यकीय ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांसह ससून रुग्णालय हे आधुनिक वैद्यकीय उपकरणांनीही सज्ज झाले आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी या रुग्णालयाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णाचे हे अवयव काढता आले. त्यासाठी ससून रुग्णालयाच्या डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.'' 

पुण्याच्या "झोनल ट्रान्स्प्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, ""यकृत आणि एक मूत्रपिंड रूबी हॉल क्‍लिनिकमधील रुग्णाला, तर दुसरे मूत्रपिंड सोलापूरच्या रुग्णाला देण्यात आले.'' 

यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शीतल धडफळे महाजनी म्हणाल्या, ""एकाच रुग्णाच्या शरीरात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची ही शहरातील दुसरी शस्त्रक्रिया होती. पुण्यातील सरकारी रुग्णालयांमधील हे पहिले अवयव दान ठरले आहे.'' 

...तर सरकारी रुग्णालयातून पहिले हृदयदान झाले असते 

"ब्रेन डेड' झालेल्या रुग्णाचे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्हीही अवयव चेन्नई येथील एकाच रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार होते. त्याची सर्व तयारी झाली होती; परंतु अंत्यसंस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृतदेह घेऊन जाण्यास उशीर होईल म्हणून गुरुवारी रात्री साडेबारा वाजता रुग्णाच्या नातेवाइकांनी हृदय प्रत्यारोपणास असहमती दर्शविली. त्यामुळे राज्याच्या सरकारी रुग्णालयातील पहिले हृदय आणि फुफ्फुसदान होऊ शकले नाही.

Web Title: Sassoon from the first organ donation