
सासवडला अंडाभुर्जीवाल्याच्या मारहाणीत दोन कचरावेचकांचा मृत्यू
सासवड : येथील भोंगळे वाईन्सलगतच्या कट्ट्यावर उन्हातून सुरक्षिता मिळावे म्हणून विश्रांतीसाठी बसलेल्या चार कचरा वेचकांना., तेथेच अंडाभुर्जीची हातगाडी लावणाऱया तरुणाने दोनदा बांबुने मारहाण केली. तसेच गरम पाणीही त्यांच्या अंगावर टाकले. त्यातून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी एका 50 वर्षे वयाच्या व दुसऱया 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
दोन्ही खून झालेल्या पुरुषांची अजूनही अोळख पटलेली नाही. नाव आणि पत्ता मिळालेला नाही. तर इतर दोन जखमी व घटनेचे साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव यांना देखील मारहाण झाल्याने ते उपचार घेत आहेत. यातील खून करणाऱया संशयित आरोपीचे नाव निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप (रा.ताथेवाडी, सासवड ता.पुरंदर) असे आहे.सासवड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी या प्रकरणी काल रात्री फिर्याद दिली. तर फिर्याद अंमलदार विनय झिंजुरके यांनी दाखल केली. याबाबत तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती आज ता. 31 रोजी दिली.
सहा पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी दाखल फिर्यादीत म्हंटले आहे की., सासवड (ता. पुरंदर) येथील भोंगळे वाईन्सलगतच्या कट्ट्यावर ही घटना ता. 23 रोजी दुपारच्या वेळी घडली. घटनास्थळाच्या बाजूस काम करणारे सुनिल रामचंद्र मुळीक यांनीही इतर साक्षीदारांसोबत याबाबत माहिती दिली. दुपारचे वेळेस कटटयावर बसलेल्या कचरा गोळा करणा-या लोकांना आरोपी पप्पु जगताप याने अगोदर हाकलण्याचा प्रयत्न केला. जगताप हा त्याठिकाणी अंडाभुर्जीची गाडी लावतो. त्याच ठिकाणी हे कचरा गोळा करणारे लोक बसलेले उठत नव्हते. त्यामुळे तो त्यांना मारहान करून उठवत होता.
त्या ठिकाणी नेहमी बसणारे एक वयस्कर आजोबा वय अंदाजे 60 वर्षे व एक कचरावेचक अनोळखी पुरूष वय अंदाजे 50 वर्षे यांना जास्त मारहाण केली. तसेच शेवंताबाई जाधव (रा.सासवड वय 60) व लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम यांनाही बांबुच्या काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर चारपैकी तिघेजण तेथेच पडुन होते. थोडयावेळाने पुन्हा हे त्याजागेवरून उठत नाही म्हणून आरोपी पप्पु जगताप याने त्याच्या हातगाडीवरील उकळते पाणी त्यायाच्या अंगावर टाकले. आजुबाजूचे दुकानातील लोक त्या ठिकाणी त्यावेळी गोळा झाले होते. पण जास्त लक्ष घातले नाही. ते कचरावेचक तेथून न गेल्याने पुन्हा मारहाण केली.
जबर मारहाणीमुळे चारपैकी दोघे पुरुष निपचीत पडून होते. त्यानंतर कोणीतरी कळविल्याने त्यांना रुग्णावाहिका येऊन घेवून गेली. नंतर रुग्णालयातून समजले की, ता. 24 रोजी 50 वयाचा पुरुष मयत झाला आहे. पोलीसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली. तर काल 60 वर्षे वयाचा पुरुषही ससून रुग्णालयात उपचारात असताना मयत झाला. त्यामुळे साक्षीदार तपासून काल रात्री उशिरा भा.द.वि .क. 302, 326 नुसार दोनजणांच्या खूनाचा व इतरांना गंभीर दुखापत करण्याबाबतचा गुन्हा सासवड पोलीसांनी आरोपी पप्पू जगताप याच्याविरुद्ध दाखल केला. तसेच आरोपीला अटक केल्याचेही पोलीस निरीक्षक घोलप यांनी आज सांगितले.
Web Title: Saswad Killed Garbage Beating
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..