सासवड पोलीस ठाण्याचे सावकारीविरुध्द विशेष अभियान

श्रीकृष्ण नेवसे 
शनिवार, 7 एप्रिल 2018

सासवड (पुणे) : येथे सासवड आणि पुरंदर तालुक्यातील परिसरात बेकायदेशीर सावकारीचे अनेक प्रकार होतात. मात्र पिळवणुक होणारे लोक आतापर्यंत दहशतीने गप्प बसत होते. आम्ही बेकायदेशीर सावकारी विरुध्द विशेष अभियान सुरु करुन स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. त्यातून तीन तक्रारी दाखल झाल्यात, त्यातील दोन प्रकरणात सावकारांना जेलमध्ये घातले आहे. तरीही धनदांडग्या व गुंडप्रवृत्तीच्या सावकारांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आज सकाळ शी बोलताना केले.  

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. संदिप पखाले, पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासमवेत खास सासवड (ता. पुरंदर) व परिसरातील बेकायदा सावकारीबद्दल चर्चा झाली. त्यातूनच येथे पोलीस ठाण्यात सावकारीच्या तक्रारी घेण्यासाठी राजेश पोळ, अजित माने या सहायकांमार्फत विशेष कक्ष निर्माण केला आहे., असे सांगून पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील पुढे म्हणाले., मी माहिती घेताना सासवड परिसरात सावकारीचा धंदा तेजीत असल्याचे समजले. कित्येक लोकांची वाईट पध्दतीने पिळवणुक होत असल्याचे समजले. काहींचा यात बळी गेल्याचेही जाणकारांनी सांगितले. त्यामुळे आशा गुंड प्रवृत्तीच्या व सावकारी पध्दतीचा बेकायदेशिरपणे वापर करणारांची आता गय केली जाणार नाही. दोन महिन्यांपूर्वी एक प्रकरण हाती घेत त्यातील सावकारांना गजाआड केले. ताज्या उदाहणात एका शेतकऱयास जीवे मारणाऱया सावकारास पोलीस कोठडीत घेतले आहे. येत्या चोवीस तासात आणखी काही सावकारांवर कारवाई झालेली दिसेल. 

सासवड शहरात फिर्यादी प्रमोद भगवानराव ताकवले (वय 46, रा. हरगुडे, ता. पुरंदर) यास त्यांच्याच गावातीलच किरण युवराज ताकवले (रा. हरगुडे) याने सावकारीच्या पैशातून विषारी अौषध पाजून खून करण्याचा प्रयत्न ता. 4 रोजी केला होता. त्यातून किरण ताकवले यास ता. 10 पर्यंत पोलीस कोठडी सासवड न्यायालयाने दिली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा व सावकारी नियमन अधिनियमाखालीही गुन्हा किरण ताकवले विरुध्द दाखल आहे. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार काका महाजन करीत आहेत. 3 लाख 73 हजार रुपये सावकारी कर्ज व्याजाने घेतले होते. त्याचे पाच टक्के दराने आतापर्यंत वेळोवेळी 1 लाख 52 हजार 500 रुपये व्याज आकारुन ते घेतले. तरीही ते दिले नाही असे म्हणून फिर्यादी प्रमोद ताकवले यास आरोपी किरण ताकवले याने मारहाण करीत विषारी अौषध पाजून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता गय नाही., असे पोलीस यंत्रणेने आज सांगितले. 

पोलीस यंत्रणा इतके चांगले काम करीत आहे, त्यामुळे सावकारी तक्रारींसाठी केलेल्या कक्षाकडे अजून एक तक्रार आली आहे. त्याबाबत जबाब नोंदविलेत. लवकरच या सावकारांनाही गजाआड केले जाईल., असे कक्षाचे सहायक राजेश पोळ यांनी सांगितले. अधिक माहिती व तक्रारींसाठी 02115 - 222333 यावर संपर्काचे आवाहन आहे. 

Web Title: saswad police station special campaign against savkar