सातारा रस्त्यावरील ‘बीआरटी’ला मुहूर्त

सातारा रस्ता - ‘बीआरटी’ मार्गावर जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे.
सातारा रस्ता - ‘बीआरटी’ मार्गावर जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे.

पुणे - पुणे-सातारा रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्गावर पावणेसहाशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. त्याकरिता मार्गाच्या डागडुजीसह बसथांबे, बॅरिकेड, पदपथाची बांधणी वेगाने सुरू असून, कामात विलंब नको, अशी तंबी देत ती आटोपण्याचा तगादा महापालिकेने ठेकेदाराकडे लावला आहे. परिणामी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथून ‘बीआरटी’ धावेल, असा दावा महापालिका करीत आहे.
दरम्यान, शहरातील ‘बीआरटी’ सेवेच्या मूळ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

येथील सहा किलोमीटर लांबीच्या मार्गावरील ‘बीआरटी’ मार्गाची मूळ बांधणी, त्यावरचे आक्षेप, मग झालेला भरमसाट म्हणजे सहाशे कोटी रुपयांच्या घरातील खर्च; तरीही देशभरातील दुसऱ्या क्रमांकाचा पथदर्शी प्रकल्प फसल्याचे स्पष्ट झाले होते. ‘बीआरटी’ मार्गाची दुरवस्था आणि त्याला जबाबदार घटकांचा कारभार उघड करीत त्यासंदर्भात ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर डोळे उघडलेल्या महापालिकेने ही योजना सावरण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातून पुनर्बांधणीचे काम संपवून प्रत्यक्ष मार्गातून ‘बीआरटी’ बस धावतील, याचे नियोजन केले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंढे आणि महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली. तेव्हा कामाचा दर्जा तपासून ठेकेदारांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

पावसकर म्हणाले, ‘‘पुणे-सातारा रस्त्यावरील ‘बीआरटी’च्या कामाला गती आली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत ती पूर्ण करण्यात येतील. तीन बसथांब्यांचे काम पुढील काही दिवस संपेल. त्यानंतर ही सेवा सुरू होईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com