सातारा रस्त्याबाबत शिवसेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी; तसेच हे काम कधी पूर्ण होणार, याची रिलायन्स इन्फ्राने लेखी हमी द्यावी, अन्यथा शिवसेना व स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिला. 

याबाबत कोंडे यांनी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना पत्र दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. सध्या पावसामुळे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे, असे कोंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

पुणे-सातारा रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसूल करू नये. तसेच हे काम कधी पूर्ण होणार, याची रिलायन्स इन्फ्राने लेखी हमी द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- कुलदीप कोंडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख

Web Title: satara road issue shivsena