सातारा रस्त्यावर पार्किंग प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खेड-शिवापूर - सोमवारी (ता. २५) झालेल्या अपघातामुळे पुणे-सातारा रस्त्यालगतच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. खेड-शिवापूर परिसरात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रमाण जादा असून, ही वाहने अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे भविष्यात अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.  खेड-शिवापूर येथील हॉटेल सागरसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मोटार आदळून चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे या परिसरात अनेक हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. 

वेळू ते खेड-शिवापूर टोल नाक्‍यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील मोजक्‍या हॉटेलमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. अनेक हॉटेलमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणी येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघाताचा धोका निर्माण होतो.  

येथील हॉटेल सागरसमोर मुळातच रस्ता अरुंद आहे. त्यातच या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेली अनेक वाहने रस्त्यावर कायम उभी असतात. सोमवारी झालेल्या अपघातातील ट्रकही सेवा रस्त्याच्या हद्दीत उभा करण्यात आला होता. अशीच परिस्थिती या भागातील अनेक हॉटेलसमोर आहे. त्यामुळे याठिकाणी रस्त्यावर कायमच अपघाताचा धोका असतो.

या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि स्थानिक पोलिसांनी अपघात झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ही वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. तरच अपघाताचा धोका टाळता येईल.

अतिक्रमणे हटविण्याची गरज
पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खेड-शिवापूर भागात कायमच वाहतुकीला अडथळा होतो. त्यातच या भागात रस्त्यालगत थाटलेल्या टपऱ्या, हॉटेल आणि अन्य व्यावसायिकांनी लावलेले फ्लेक्‍सही वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यालगतची ही अतिक्रमणे हटविण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Satara road parking issue