सतीश ननवरेंनी पटकाविला आयर्नमॅनचा किताब

nanaware
nanaware

बारामती (पुणे) : जिद्द व आत्मविश्वास असेल तर जगात काहीही अशक्य नाही हीच बाब बारामतीचा आयर्नमॅन सतीश रामचंद्र ननवरे यांनी सिध्द करुन दाखविली आहे. 

येथे काल झालेल्या या स्पर्धेत नियोजित वेळेपेक्षा लवकर ही स्पर्धा पूर्ण करुन बारामती सायकल क्लब तसेच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा सदस्य असलेल्या सतीशने आयर्नमॅनचा किताब पटकाविला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून हा किताब पटकाविणारा तो पहिलाच मराठी माणूस आहे. 

जलतरण, धावणे व सायकलींग अशा तिहेरी प्रकारात नियोजित वेळेपूर्वी म्हणजे बारा तास 33 मिनिटे 45 सेकंदात  त्याने ही स्पर्धा पूर्ण केली.  मराठी माणसेही सातासमुद्रापार आपला झेंडा फडकवून आपले कर्तृत्व दाखवून देतात हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. 

180 कि.मी. सायकलींग, 42 कि.मी. धावणे व 4 कि.मी. जलतरण अशी अत्यंत खडतर ही स्पर्धा असते. गेले वर्षभर त्याने या स्पर्धेसाठी कमालीची मेहनत घेतली होती. बारामती पुणे हे अंतर तो सरावासाठी सायकलवरुन तो पूर्ण करायचा. 

त्याच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी बारामती सायकल क्लबचे अँड. श्रीनिवास वायकर, सुजित पराडकर व सुरेश परकाळे हेही सतीश ननवरे याच्यासोबत ऑस्ट्रिया मधील क्लॅनफर्ट येथे गेले होते. या स्पर्धेसाठी यंदा संपूर्ण भारतातून 26 स्पर्धक सहभागी झाले होते. 

अडचणींवर मात करुन ध्येयप्राप्ती
स्पर्धेपूर्वी महिनाभर अगोदर वडीलांचे आकस्मिक निधन, सराव करतानाही अनेक अडचणींवर मात करत सतीश ननवरे यांनी ही स्पर्धा नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केली हा यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. सतीशने ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर बारामती सायकल क्लबसह त्याच्या मित्रपरिवाराने बारामतीत एकच जल्लोष केला. या स्पर्धेत या निमित्ताने बारामतीचा झेंडा प्रथमच फडकला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सतीशच्या या य़शाबद्दल त्याचे अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com