नारायणगावला सतीशिळा आढळली

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जुन्नर -  नारायणगाव ता.जुन्नर येथील प्रा.जयवंत कठाळे यांना दुर्लक्षित ठिकाणी सतीशिळा आढळून आली असल्याचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

नारायणगाव येथील श्री संतसेना महाराज समाज मंदिरा जवळून मीना नदीवरील नेवकर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेकडील दुर्लक्षित अशा ठिकाणी ही सतीशिळा असल्याचे त्यांनी सांगितले. 

ताम्हाणे यांनी या सतीशिळेचे बारकाईने निरीक्षण केले. एका उंच दगडी चबूतऱ्यावर एक ते दीड उंचीच्या सपाट दगडावर हाताच्या कोपरात काटकोनात दुमडलेला स्त्रीच्या हाताचा पंजा दाखविला असून मनगटात चुडा भरलेला, दंडावर चोळीचा भाग, तळहातावर गोल प्रतीक असलेले चिन्ह स्पष्ट दिसत आहे. सतीशिळेवर सूर्य कोरलेला असून याचा अर्थ जोपर्यंत सूर्य उगवत आहे तो पर्यंत या सतीची कीर्ती कायम राहील असे सती शिळेतुन सांगावयाचे असेल असे त्यांनी सांगितले.

सतीशिळा म्हणजे काय याविषयी ते म्हणाले, मध्ययुगीन कालखंडात युद्धात वीर मरण आलेल्या विराची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरीव शिळा उभारत असत.या शिळेवर काटकोनात स्त्रीचा कंकणाकीत हात दाखविला जातो.काही ठिकाणी केवळ हात कोरलेला दगड असतो.त्यास सतीचा दगड अथवा सतीशिळा म्हणतात. कर्नाटकात त्यास मास्तीकल्लू तर गुजाराथ मध्ये पाळीया म्हणतात.

पतीसोबत सती जाणाऱ्या काही सतीशिळावर तीन प्रमुख भाग आढळून येतात.सर्वात खालच्या भागात युद्ध करणारा वीर, मधल्या भागात धारातीर्थी पडलेल्या विराचे डोके मांडीवर घेऊन बसलेली स्त्री,वरील भागात चंद्र सूर्य यांच्या प्रतिकृति किंवा वीर व त्याची पत्नी आकाशात उडताना दाखविले जातात. क्वचित सतीशिळेवर सतीचे चित्र व खालच्या भागात लेख कोरलेले असतात.यामुळे सती कोण, कोणाची पत्नी,केव्हा सती गेली आदी माहिती मिळते.काही ठिकाणी आजही सतीशिळेची पूजा करण्यात येते. सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

Web Title: satishila found in narayangaon