सत्यशोधक रा. ना. चव्हाण यांच्याबाबत 28 वर्षे उपेक्षाच 

संपत मोरे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - सत्यशोधक विचारवंत लेखक रा. ना. चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 17 जानेवारी 1991 या दिवशी एक पत्र पाठवून "तुम्हाला डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे' असे कळवले, मात्र प्रत्यक्षात त्याना डी.लिट. पदवी मिळालीच नाही. त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर पदवी मिळावी म्हणून त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी आजवर अनेकदा सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र अद्यापही त्याना यश मिळालेले नाही. रा. ना. चव्हाण यांची डी.लिट. पदवी गेली 28 वर्षे लालफितीत अडकली ती अडकलीच. सन्मान घोषित करूनही न देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

रा. ना. चव्हाण मूळचे वाईचे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सहकारी आणि लेखनिक म्हणून काम केले. त्यांनी इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, सामाजिक चळवळी, चरित्रग्रंथ या क्षेत्रात मोठे काम केले. त्यावर पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. त्यांची एकूण 37 पुस्तक आहेत. काही पुस्तक विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक पत्र पाठवून "तुम्हाला डी. लिट. पदवीने सन्मानित करण्यात येत असल्याबाबत कळवले. त्याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रातून आल्या. नंतर मात्र त्याना प्रत्यक्षात पदवी दिली नाही. त्यानंतर 1993 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तरी त्याना सन्मानित करण्यात यावे म्हणून त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी शासन दरबारी अर्ज केले; पण अजूनही त्यांना यश मिळालेले नाही. 

याबाबत पुण्यात आल्यावर चव्हाण म्हणाले, ""रा. ना. चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांची ही चेष्टा आहे. मी प्रत्येक वर्षी विद्यापीठाला एक स्मरणपत्र पाठवतो. पण त्या पत्राची दखलही घेतली जात नाही. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू असताना त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनाही यश मिळाले नाही. माझ्या वडिलांच्या हयातीत त्यांना डी.लिट. मिळाली नाही, मरणोत्तर तरी मिळावी अशी अपेक्षा आहे.'' 

""या विषयाबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.याबाबतचा रा. ना. चव्हाण यांच्या कुटुंबीयाकडे असलेला पत्रव्यवहार त्यांनी विद्यापीठाकडे द्यावा.'' 
-जयश्री सूर्यवंशी, संचालक परीक्षा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 

Web Title: Satyashodhak Writer Ra. Na. Chavan no D.Lit. Degree