सविताभाभी...तू इथंच थांब! पुण्यातील होर्डिंगची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुण्यातील वेगळ्या आशयाच्या होर्डिंगची नेहमीच चर्चा होत असते. यापूर्वीही अनेकदा पुण्यातील होर्डिंगची चर्चा झाली आहे. पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले आहेत. आता सविताभाभी... तू इथंच थांब ! अशा आशयाच्या होर्डिंगची पुण्यात चर्चा चालू आहे. 

पुणे : पुण्यातील वेगळ्या आशयाच्या होर्डिंगची नेहमीच चर्चा होत असते. यापूर्वीही अनेकदा पुण्यातील होर्डिंगची चर्चा झाली आहे. पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले आहेत. आता सविताभाभी... तू इथंच थांब ! अशा आशयाच्या होर्डिंगची पुण्यात चर्चा चालू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातल्या म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिज जवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सविताभाभी तू इथंच थांब म्हटल्याचे होर्डिंग पाहून पुणेकरांचे पाय थांबले. होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविताभाभी नेमक्या कोण? असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला आहे. पुणेकरांना मात्र याचा काही संबंध लागत नसल्याचे सध्या चित्र आहे.

Image result for dada ek good news aahe baner in pune

केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

काही वर्षांपूर्वी 'दादा,एक गुड न्यूज आहे' असे पोस्टर पुण्यात झळकले होते. या पोस्टरमुळेही चांगलाच गदारोळ उडाला होता. एवढंच नाहीतर पोलिसांनी हे पोस्टर हटवलेही होते. पण, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री प्रिया बापटने हे आपल्या नाटकाचे पोस्टर असल्याचं जाहीर केलं. पिंपरी चिंचवडमध्ये शिवडे आय एम सॉरी! आणि 'सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात' या होर्डिंग्सचीही जोरदार चर्चा झाली होती.

Image result for dada ek good news aahe baner in pune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: savita bhabhi banner viral in pune