सावित्रीबाई फुले यांना विविध संस्था व संघटनांचे अभिवादन 

सावित्रीबाई फुले यांना विविध संस्था व संघटनांचे अभिवादन 

पुणे - "सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जयघोष...त्यांच्या कार्यकर्तृत्वावर सादर केले जाणारे पोवाडे, गीते...फुले यांच्या अखंडाचे सामूहिक गायन  आणि व्याख्यानांद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. विशेषतः शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या सावित्रीच्या लेकींनी अभिवादन करून शिक्षणाचा वारसा जोपासण्याची शपथ घेतली. शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या आनंदोत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. 

महात्मा फुले पेठेतील फुलेवाडा, पुणे विद्यापीठ, सारसबाग, महापालिकेचे शिक्षण मंडळ यासह शहराच्या विविध भागांमधील फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त फुलेवाड्याला खास सजविण्यात आले होते. सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या जयघोषाने पुतळ्याचा परिसर दुमदुमून गेला. शहराच्या विविध भागांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांनी फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली. याबरोबरच बहुतांश शासकीय कार्यालयांमध्येही फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला आणि युवतींनी फुले स्मारकाला भेट देऊन फुले यांच्या कार्याची माहिती घेतली. 

हमाल पंचायत, महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठान, पथारी व्यावसायिक, रिक्षा पंचायत आदी कष्टकरी संघटनांतर्फे डॉ. बाबा आढाव यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी नवनाथ बिनवडे, बाळासाहेब मोरे, छात्रभारतीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अभिवादनानंतर सर्वांनी फुले यांच्या अखंडाचे सामूहिक गायन केले. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी शिक्षण मंडळातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, असित गांगुर्डे, अशोक शिरोळे, महेश शिंदे, महिपाल वाघमारे उपस्थित होते. अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सारसबागेजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी प्रा. दादा शिंदे, दिलीप राऊत, प्रशांत एकतपुरे, प्रा. एम. एम. फुले उपस्थित होते. 
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अभिवादन केले. या वेळी माधवी गोसावी, प्राजक्ता कलंगुडे, प्रतिभा चाकणकर उपस्थित होत्या. शहर जिल्हा महिला कॉंग्रेस पक्षातर्फे सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. समितीच्या मागासवर्गीय विभागातर्फे समीरा गवळी आणि मालन धिवार यांनीही पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे (इंटक) ऍड. फय्याज शेख, महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयातर्फे अनिल अगावणे यांनी अभिवादन केले. महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे कैलास हेंद्रे यांनी अभिवादन केले. प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे प्रा. मयूर गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे आनंद सवाणे, भीमशक्तीतर्फे शहराध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. विश्‍व वाल्मीकी सेनेचे अध्यक्ष पी. के. साळुंके, महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर राऊत, माळी आवाज संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार लडकत तर साध्वी सावित्रीबाई फुले मंडळातर्फे माजी आमदार कमल ढोले पाटील यांच्या हस्ते फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मातोश्री रमाबाई आंबेडकर संघर्ष समितीतर्फे ज्योती परिहार यांनीही फुले यांना अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com