पुणे विद्यापीठही आता ‘इलेक्शन’मूडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule at Pune University election Extension for voter registration Registration of 51 thousand people pune

पुणे विद्यापीठही आता ‘इलेक्शन’मूडमध्ये

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या वर्षी होणाऱ्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या नोंदणीत अधिकाधिक सहभाग वाढवा यासाठी विद्यापीठाने नावनोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पदवीधरांना १४ जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना १३ जुलैपर्यंत तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी १० जुलैपर्यंत मतदरनोंदणी करता येणार आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया १ जून २०२२ पासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पन्नास हजारांहून अधिक नोंदणी

या निवडणूक प्रक्रियेसाठी दरवर्षी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार आतापर्यंत २० हजार ४३७ जणांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर ३० हजार २५४ जणांनी पुन्हा नोंदणी केली आहे. आजमितीला जवळपास ५१ हजार जणांची यासाठी नोंदणी झाली आहे.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी धेय्य धोरण ठरविण्यात विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणांची भूमिका मोठी आहे. या मुळे या निवडणुकीसाठी पदवीधर, शिक्षक, विभागप्रमुख आणि संस्थाचालक या सर्व घटकांच्या व्यापक सहभागातून या लोकशाही प्रक्रिया बळकट होतील.

- डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule At Pune University Election Extension For Voter Registration Registration Of 51 Thousand People Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top