सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून प्रेरणा : पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : "समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत ज्ञानज्योती पोचविण्याचे काम ज्या सावित्रीबाई फुले यांनी केले, त्यांच्या पुतळ्यापासून या परिसरात येणाऱ्या शिक्षिका व विद्यार्थिनी निश्‍चित प्रेरणा घेतील,'' असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

महापालिका शिक्षण मंडळ कार्यालयाच्या आवारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, सदस्य बाळासाहेब जानराव, मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, माजी आमदार कमल ढोले-पाटील, डॉ. वृषाली रणधीर उपस्थित होते.
 
Web Title: savitribai phule gives inspiration, says ajit pawar