सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वीज पुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वीज पुरवठा गुरुवारपासून खंडित होत आहे. गुरुवारी दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत संपूर्ण विद्यापीठातील बत्ती गुल झाली होती. वीज पुरवठा करणाऱ्या भूमिगत केबलमधील बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम आज (शुक्रवार) उशिरापर्यंत सुरू होते.

विद्यापीठात गुरुवारी वीज पुरवठा करणाऱ्या भूमिगत केबलमध्ये काही बिघाड झाला होता. दिवसभर हे दुरुस्ती काम सुरू होते. परिणामी संपूर्ण विद्यापीठात दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु, आज विद्यापीठाच्या काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यानंतर आणखी काही बिघाड असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत विद्यापीठातील 60 टक्‍क्‍याहून अधिक परिसरात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांनी दिली.

Web Title: savitribai phule pune university breaks the power supply