बहिःस्थ बंद; दूरस्थ सुरू

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑगस्टपासून प्रवेश
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षीची बहिःस्थ परीक्षा पद्धत बंद करण्यात आली आहे. आता मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम. आणि एम. बी. ए. हे अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीवर सुरू करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी पदवीसाठीचे द्वितीय व तृतीय वर्षाचे व पदव्युत्तरांसाठी द्वितीय वर्षाचे प्रवेश हे बहि:स्थ म्हणूनच देण्यात येतील.

दूरस्थ शिक्षण पद्धती ही अधिक कालसुसंगत आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन आणि अध्ययनाचे साहित्य पुरवलेवि जाणार असल्याने त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणेही शक्‍य होणार आहे. तसेच, ती राबविल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात "यूजीसी'ची गुणवत्ता सुधारणेबाबतची मार्गदर्शक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे राबविता येणार आहेत.

त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे अतिरिक्त संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.

दूरस्थ पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवर त्या त्या विषयाचे मार्गदर्शन व अध्ययनासाठीचे आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे विषयाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास व्हावा, यासाठी वेळोवेळी "असाइनमेंट' करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा बहि:स्थ शिक्षण पद्धतीत उपलब्ध नव्हती. विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार अभ्यास केंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.

स्वतंत्र वेबपोर्टल
दूरस्थ अभ्यासक्रम इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच राहतील व सत्रऐवजी वार्षिक परीक्षा पद्धत श्रेयांकांनुसार मूल्यमापन पद्धत राबविण्यात येईल. दूरशिक्षण अभ्यासक्रमाबाबत प्रवेश, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मदत, सूचना आदी सुविधांसाठीचे स्वतंत्र वेबपोर्टल तयार केले जात आहे. तसेच, येत्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दूरशिक्षण अभ्याक्रमाचे प्रवेश सुरू करण्यात येतील. दूरशिक्षण विभागामार्फत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यास केंद्रावर प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग विद्यापीठातर्फे चालविले जाणार आहेत. या वर्गांचे वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेनंतर जाहीर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com