विद्यापीठात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम’ची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university

विद्यापीठात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम’ची स्थापना

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची’ स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून कौशल्य विकास केंद्रामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, आंतरशाखीय अभ्यासमंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, कौशल्य विकास विभागाचे संचालक व वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विधी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती भाकरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने फोरमचे उद्घाटन करण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकत्रित विचाराने विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमांचे नियोजन करणे हे या फोरमचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. काळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ याद्वारे आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढवी. तसेच त्यांच्यातील कार्यकुशलता वृद्धिंन्गत करण्यासाठी, अद्ययावत ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाईल.’’ या वेळी उद्योग क्षेत्रातील क्लीनमॅक्स एनर्जी उद्योगाचे व्यवस्थापक धनंजय नांदेडकर, पनामा उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल नलावडे, कल्प पॉवर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

कमलेश कटारिया, औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य राम काकडे, कमिन्स उद्योगाचे माजी व्यवस्थापक सुनील बर्वे, टेक्नोराईट्स संस्थेचे संचालक मकरंद पंडित, बी एम सी आंतरराष्ट्रीय कंपनीचे माहिती रचना व विकसन विभागाचे संचालक परेश नाईक आदींचा सहभाग होता. फोरमची कल्पमा डॉ. अंजली जगताप-रामटेके यांची होती. डॉ. पूजा मोरे, डॉ. रवी अहुजा यांनीसंयोजन केले व धनंजय मुंढे, अजित झेंडे, प्रियांका माने आदींचे सहकार्य लाभले

Web Title: Savitribai Phule Pune University Establishment Of Ndustry Academia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..