Pune : विद्यापीठात कोणतीही भरती प्रक्रिया नसल्याचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university

Pune : विद्यापीठात कोणतीही भरती प्रक्रिया नसल्याचा खुलासा

पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत रिक्त जागांची भरती सुरू आहे, संधी चुकवू नका’, अशा स्वरूपाचे निवेदन, मेसेज तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे किंवा अन्य माध्यमातून येत असतील, तर सावधान! अशा निवेदनांना हुरळून जाऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. होय, अशा स्वरूपाचे निवेदन सध्या सोशल मीडिया साईट्स‌द्वारे प्रसिद्ध करण्यात आले असून, त्याचा विद्यापीठाशी काहीही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

पुणे विद्यापीठाकडून भरतीची प्रक्रिया ही शासनाच्या दिलेल्या प्रक्रियेनुसारच केली जाते. विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेची माहिती ही कायमच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्या-त्यावेळी प्रसिद्ध केली जाते. तरीदेखील विद्यापीठाच्या नावाने काही सोशल मीडिया व काही माध्यमांद्वारे ‘पुणे विद्यापीठाअंतर्गत रिक्त जागांची भरती, संधी चुकवू नका’, अशा मथळ्याखाली निवेदने प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत काही तक्रारीही विद्यापीठाकडे आलेल्या आहेत. या निवेदनांचा विद्यापीठाशी काहीही संबंध नाही. याबाबत कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत प्रकटनाद्वारे सांगितले आहे.