राज्यातील पाण्याचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे विद्यापीठाकडून पुनर्प्रकाशन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम
Savitribai Phule Pune University reprint of book Water supply in Maharashtra history of water in state
Savitribai Phule Pune University reprint of book Water supply in Maharashtra history of water in state sakal

पुणे : महाराष्ट्रातील पाऊस, पाणी, जमीन, नद्या असा सर्वांगीण शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणारे नरहर आपटे यांचे ‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुनर्प्रकाशित करण्यात आले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे या पुस्तकाची प्रत मिळाली असून यात राज्यातील पाण्याचा मूळ इतिहास, त्यामागे असणारे भूशास्त्र आणि विज्ञान असा परिपूर्ण अभ्यास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

या पुस्तकाचे पुनर्संपादन डॉ. चाकणे आणि प्रसेनजीत फडणवीस यांनी केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार, डॉ. महेश आबाळे, अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, मुद्रणालय व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. करमळरकर म्हणाले,‘‘राज्यातील पाण्याबाबतची संपूर्ण प्राथमिक माहिती या पुस्तकात आहे. भूगर्भशास्त्राचा प्राध्यापक म्हणून राज्यातील ही अनेक वर्षे जुनी माहिती, संदर्भ लोकांसमोर यावे असे वाटते, म्हणून पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला.’’ विद्यापीठाच्या मुद्रणालयातून १९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाकडून संबंधित पुस्तक लिहिण्याची सूचना केली होती. त्यानुसार हे पुस्तक त्यावेळचे अनेक संशोधनपर अभ्यास, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील अभ्यासाचे संदर्भ देत लिहिण्यात आले. पुस्तकात महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ स्रोत, ते साठवण्यामागचं शास्त्र, जमिनीचा प्रकार, नद्या, नद्यांचे क्षेत्रफळ, तलाव, शेती, विहिरी अशी सर्व माहिती आकडेवारीसह प्रकाशित केली आहे, असे डॉ. चाकणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com