स्मार्ट सिटीसाठी आता विद्यापीठाचाही हातभार

Pune-University
Pune-University

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुण्याला ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हातभार लागणार आहे. शहरातील समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठातील इनक्‍युबेशन सेंटरमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठ आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

शहरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी नवउद्योजकांच्या (इनोव्हेटर्स) माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन अँड लिंकेजेस आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला. याअंतर्गत नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या नवउद्योजकांना स्मार्ट सिटीतर्फे सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल.  या करारावर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ‘इनक्‍युबेशन सेंटर’च्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. राजेश्वरी देशपांडे, मनोजित बोस आदी या वेळी उपस्थित होते.

शहरातील विविध प्रश्‍नांवर उपाय असणाऱ्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या करारानुसार केला जाणार आहे. डॉ. पालकर म्हणाले, ‘‘नवउद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी इन्क्‍युबेशन सेंटरमार्फत अर्ज मागविण्यात आले होते. त्यातून काही निवडक उद्योजकांच्या कल्पनांना पाठबळ देण्यात येईल. नवउद्योजकांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सल्लागार असणार आहे.’

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पात आता विद्यापीठालाचाही हातभार लागणार आहे. शहराला भेडसावणाऱ्या समस्यांवर इनक्‍युबेशन सेंटरच्या नवउद्योजकांमार्फत प्रत्यक्षात उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com