विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी पाच वाजता आयोजिला आहे. या कार्यक्रमासाठी विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात अकरा जणांना सुवर्णपदक दिले जाणार आहेत. 

2016-17 मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सात हजार 242 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली. 

सुवर्णपदक विजेते विद्यार्थी... 
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग ः देवयानी पाटील, आकाश हजारी, उदय सुतार, गंभीर विद्याधर, अनुश्री कोगजे, भूषण गरवारे, प्रज्ञा दीक्षित, सायली काळे, सुधीर माळी, तायरोन मिरंडा, झोहराझबीन शेख. 

Web Title: Savitribai phule Pune University's award-giving ceremony will be held on Friday