पुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या शंभरीत स्थान पटकाविले आहे. या यादीत विद्यापीठाने ९३ व्या क्रमांकाचा मान पटकाविला असून, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) १०९ वे स्थान मिळविले आहे. 

विद्यापीठातील अध्यापन, ज्ञान, संशोधन, माहितीची देवाण-घेवाण, अभ्यासक्रमातील बदल, अशा जवळपास १३ निकषांवर आधारित हे जागतिक स्तरावर रॅंकिंग करण्यात आले. यामध्ये जवळपास ४३ देशांमधील ४४२ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. भारतातून निवड झालेल्या ४९ संस्थांपैकी २५ संस्था या पहिल्या २०० क्रमांकांमध्ये आहेत. त्यात बंगळूरची भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस्सी), आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी इंदूर, जेएसएस ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, आयआयटी दिल्ली, आयआयटी चेन्नई, अशा संस्थांचा समावेश आहे. या यादीत पहिल्या चार क्रमांकावर चीनमधील विद्यापीठांनी मोहोर उमटविली आहे.

विद्यापीठाने देश-विदेशांतील दर्जेदार विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांशी सामंजस्य करार केला असून, त्याचे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विद्यापीठामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर विद्यापीठाचे रॅंकिंग दर वर्षी उंचावत आहे.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule University of Pune has secured the first rank in Emerging Economics University Ranking announced by The Times Higher Education