संन्याशाकडून स्वरांचे कैवल्य

सवाई गंधर्व स्मारक - सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’ या चर्चासत्रात गायक स्वामी कृपाकरानंद यांच्याशी उल्हास पवार यांनी  संवाद साधला.
सवाई गंधर्व स्मारक - सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’ या चर्चासत्रात गायक स्वामी कृपाकरानंद यांच्याशी उल्हास पवार यांनी संवाद साधला.

Sawai Gandharva 2019 : पुणे - एखादा संन्यासी रागदारी गातो आहे, तेही तीस वर्षांपूर्वी जेमतेम पंधरा दिवस गुरूकडून शिकून, हे त्यांचं ते भावप्रवाही गायन ऐकून खरं वाटत नव्हतं. शिवाय हे न्यूरोसर्जन आहेत, हे ऐकल्यावर तर प्रचंड आश्‍चर्य वाटले.

एम.बी.बी.एस., उत्तम गायक, रामकृष्ण मठातील संन्यासी असा त्रिवेणी संगम असलेले स्वामी कृपाकरानंद यांचं बोलणं श्रोत्यांवर खोलवर परिणाम घडवत होते. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’मध्ये स्वामी कृपाकरानंद यांची मुलाखत राजकीय नेते व अध्यात्मात रस असलेले उल्हास पवार यांनी आज सकाळी घेतली. शिवाजीनगरमधील सवाई गंधर्व स्मारक सभागृहात आर्य प्रसारक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला उषा देशपांडे दिग्दर्शित ‘खयाल’ हा माहितीपट दाखविण्यात आला.

कृपाकरानंद म्हणाले, ‘‘संगीतात भाव नसेल तर ते निष्फळ म्हणायला हवे. माणसं एखाद्याची भाषा येत नसतानाही केवळ बोलणाऱ्याच्या सुरावरून त्याला काय सांगायचं आहे ते ओळखतात. कारण, भावानुरूप सूर व्यक्त होतात. या अर्थाने सुरांची भाषा वैश्‍विक आहे. यात कोणीही बेसूर नाही. विद्वत्ता असणाऱ्यांनी संगीताला खुजे केले. लोकसंगीत गाणाराही मनावर प्रभाव टाकू शकतो. नैसर्गिक ध्वनींमध्ये वेगवेगळे राग होतेच. त्यांना नंतर शास्त्राचे रूप देण्यात आले. पाश्‍चात्य संगीताच्या तुलनेत भारतीय संगीताच्या मुळाशी अध्यात्म असल्याने याचा उपयोग शारीरिक, मानसिक व्याधी बऱ्या करण्यासाठी होतो. फक्त गुहेत राहून तपश्‍चर्या करणे, मौनात राहणे म्हणजे संन्यास नाही.

गृहस्थाश्रमातील व्यक्तीही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून सत्याचा शोध घेत असते. संन्यासात आध्यात्मिक उंची अभिप्रेत असते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com