‘शैलींशी मैत्रीचं नातं’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

जम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व शिष्य असलेले राहुल शर्मा स्वतःही प्रयोगशील संतूरवादक म्हणून देशपरदेशात ख्याती मिळवीत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांचं वादन पूर्वीही झालेलं आहे. यंदाही ते या मंचावर वादनासाठी उत्सुक आहेत. 

प्रश्न - वडिलांशी तुलनेचं दडपण सतावतं का? 
राहुल -
 वडील जगप्रसिद्ध वादक आणि गुरूही असले तर मुलगा व शिष्य म्हणून लोकांनी त्यांच्याशी तुलना करीत वाढीव अपेक्षा ठेवणं स्वाभाविकच आहे. त्यातं सुरवातीला थोडं दडपण यायचंही. नंतर लक्षात आलं, की स्वरमंचावर सादरीकरण करताना स्वतःची गुणात्मकता दिसली पाहिजे. गुरूची नक्कल किती काळ लोक ऐकून घेतील? त्यातून महत्त्वाचं म्हणजे, स्वरमंच काही रेकॉर्डिंग स्टुडिओ नव्हे, जिथं वारंवार रिटेकची संधी मिळेल. इथं पूर्ण तयारीनिशीच यावं लागतं. मेहनत घेऊन स्वतःला घडवावं लागतं. हे उमगल्यावर दिशा मिळाली. अर्थात, अशी उकल होण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन गरजेचं असतं. गुरूची योग्यता हे सारं घडवून आणते. शिष्याला त्याचा ‘स्व’ शोधायला प्रेरित करते. सवाईत वाजवायला मिळणं हाही फार मोठा आशीर्वादच आहे. इथंही सादरीकरणात कस लागतो. 

प्रश्न - परंपरा जपूनही तुम्ही निरंतर नवतेच्या वाटेवर कार्यरत दिसता. हे दोन्ही कसं साधता? 
राहुल -
 माझ्या वडिलांनीही प्रयोग केले. संतूरला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मानाची जागा मिळवून दिली. चित्रपट संगीतात संतूर लोकप्रिय केलं. आज मी जॅझ आणि रॉक म्युझिकचे प्रयोग करतो. जागतिक पातळीवर संतूरला वरचा मान मिळवून देण्यासाठी काही करू शकलो. शास्त्रीय संगीत हा माझ्या वादनाचा आत्मा आहेच, पण जग जवळ येत चाललेलं असताना संगीताच्या निरनिराळ्या शैलींशी फटकून वागण्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीचं नातं जोडावं. मी याच भावनेतून फ्युजनमध्ये सहभागी होतो. चित्रपट व अल्बमला संगीत देतो. 

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Rahul Sharma