जुन्नरला स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद बिनविरोध        

दत्ता म्हसकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल माजिद कासमअली सय्यद यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

जुन्नर (पुणे) : जुन्नर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल माजिद कासमअली सय्यद यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत सदस्य नितिन गांधी यांनी 12 मार्चला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे स्वीकृत सदस्याच्या रिक्त जागेसाठी पांडे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. आज बुधवारी (ता.4) नगर पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल माजिद सय्यद, रउफखान पठाण, नवरोज सय्यद, संदीप घोणे, अरुण भगत, सुनील ढोबळे यांनी मंगळवारी (ता.3) जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले. यामुळे आज सभा सुरू झाल्यावर गटनेते दिनेश दुबे यांनी पक्षनेते अतुल बेनके यांचे सूचनेनुसार सय्यद अब्दुल माजिद सय्यद यांचे नाव राष्ट्रवादी कडुन निश्चित करण्यात आले असल्याचे पत्र दिले.  

यानंतर सय्यद यांची बिनविरोध निवड झाल्याचे पांडे यांनी जाहिर केल. विशेष सभेस मुख्याधिकारी जयश्री काटकर, अलका फुलपगार, दिनेश दुबे, फिरोज पठाण, समिर भगत, अविनाश करडिले, जमिर कागदी, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, मोनाली म्हस्के, कविता गुंजाळ, अश्विनी गवळी, हाजरा इनामदार, सना मंसुरी, समिना शेख उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेल्या माजिद सय्यद अब्दुल यांचा नगर अध्यक्ष शाम पांडे, शहर अध्यक्ष धनराज खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  संख्येने उपस्थित होते.

Web Title: sayyad as a nominated corporator in junnar