सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे औषधांचा तुटवडा: वळसे पाटील

घोडेगाव (ता. आंबेगाव) ः ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
घोडेगाव (ता. आंबेगाव) ः ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.

घोडेगाव (पुणे): "राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. सर्वसामान्य माणूस सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला औषधे विकत आणावी लागतात. अशा परिस्थितीतही आंबेगाव तालुक्‍यात विविध संस्था व व्यक्तींच्या देणगीतून औषधांवर खर्च केले जात आहेत, याचा मला अभिमान आहे,'' असे मत राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयात शरद सहकारी बॅंकेने दोन लाख रुपये खर्च करून रक्त साठवण केंद्र दिले. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी वळसे पाटील बोलत होते. या वेळी शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, माजी सभापती कैलासबुवा काळे, सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, सखाराम घोडेकर, प्रकाश घोलप, श्रीकांत गाढवे, डॉ. गीता कुलकर्णी, दत्ता थोरात, दिलीप काळे उपस्थित होते. या वेळी वळसे पाटील म्हणाले, "आंबेगाव तालुक्‍यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयात व घोडेगाव येथील रुग्णालयात देणगीतून गोळा झालेले पैसे रुग्णांसाठी वापरले जातात. शरद बॅंकेने मदत केल्यामुळे रक्ताची गरज आता रुग्णालयात उपलब्ध होईल. मंचर येथे दोन डायलिसिस मशिन व घोडेगाव येथे दोन डायलिसिस मशिन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.'' यावेळी डॉ. गीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी लोंढे, क्रांती गाढवे, श्रीकांत गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गणेश काळे यांनी केले. तर आभार डॉ. नंदकुमार पोखरकर यांनी मानले.

रुग्णालयास मदतीचे आवाहन
भाषणात वळसे पाटील यांनी शासन मदत करेल तेव्हा करेल, परंतु रुग्णालयातील प्रत्येक माणसाला मदत करण्याचे काम आपले आहे. वाढदिवस व लग्नसमारंभातील काही रक्कम वाचवून रुग्णालयाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राम ग्रामीण पतसंस्थेने रामशेठ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त 11 हजार रुपयांची मदत रुग्णालयाला देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com