प्रलंबित कामे मार्गी लावा - आमदार सुनील शेळके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणे व सबबी न सांगता तालुक्‍यातील अपूर्ण व प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असा आदेश आमदार सुनील शेळके यांनी दिला. अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

वडगाव मावळ - अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणे व सबबी न सांगता तालुक्‍यातील अपूर्ण व प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असा आदेश आमदार सुनील शेळके यांनी दिला. अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मावळ तालुक्‍यात विविध खात्यांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. ४) येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते, या वेळी शेळके बोलत होते. तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, शोभाताई कदम, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, महादू उघडे, विठ्ठलराव शिंदे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे उपस्थित होते.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

वनक्षेत्र परिसरात येत असल्याने काही गावे, देवस्थान व धार्मिक स्थळे परिसरातील विकासकामे रखडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. समाजहित लक्षात घेऊन वनखात्याने या कामांना आडकाठी करू नये. कामांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून अधिकृत मंजुरी मिळवावी, अशी सूचना शेळके यांनी केली. 

तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा करण्यासाठी, तसेच वडगाव व लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, कामशेतसह तालुक्‍यातील रखडलेल्या पुलांची कामे मार्गी लावावीत, नादुरुस्त पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करावेत, तालुक्‍यात पशुसंवर्धनचे मॉडेल ठरेल अशा दवाखान्याचा प्रस्ताव तयार करावा आदी सूचना त्यांनी या वेळी केल्या. कामशेत येथील उड्डाण पुलाचे, देहूरोड येथील रेल्वे पुलाचे व वडगाव येथील सेवा रस्त्याचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. टंचाई आराखड्यांतर्गत नळपाणी पुरवठा योजना व विंधन विहिरी दुरुस्तीचे एक कोटी ४६ लाख रुपयांचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीत पीएमआरडीएमार्फत करावयाचे रस्ते, विविध योजनांमधून करण्यात येणारी घरकुले यांचाही आढावा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schedule pending works sunil shelake