धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला द्यावा मिळावा अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

पुणे : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काही दिवसांत राज्यभर आंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. 
 
राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यासोबतच सोलापूर येथील विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन दाखला देण्यात यावा, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून आपण वंचित विकास आघाडीतर्फे विधानसभा निवडणूक लढविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scheduled Tribe certificate should be given to Dhangar community