दिव्यांग व अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी योजना

संदिप जगदाळे
बुधवार, 28 मार्च 2018

हडपसर (पुणे) : समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटूंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेमुळे दिव्यांग नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहित होत आहेत. याकरीता राज्यातील आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर दिव्यांग व अव्यंग व्यक्ती विवाहास प्रोत्साहन देण्याची योजना सुरू केली असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी दिली. 

पुणे जिल्हा परिषद येथे दिव्यांग- अव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत १३ जोडप्यांचा सत्कार कोरगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना बचत प्रमाण वाटप करण्यात आले, याप्रसंगी कोरगंटीवार बोलत होते. याप्रसंगी लाभार्थी संदीप ओव्हाळ, नारायन बोराटे, मिलींद जगताप, प्रकाश सांगवे, प्रकाश सुर्यवंशी, नितीन जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावर्षी १३ लाभार्थींची या योजनेसाठी निवड करण्यात आली. 

कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण कार्यालयातील सहाय्यक सल्लागार शुभदा गोगावले, विद्या देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी भांगरे, भाउसाहेब कांबळे, रमेश बागले, पूर्वा जोशी उपस्थित होते. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग वधू-वर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. लाभार्थी वधू-वरांपैकी एक दिव्यांग व्यक्ती ४० टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असल्याचे सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र असावे. वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्पोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतली नसावी. विवाह हा कायदेशिररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा समाजकल्याण कार्यालयात अर्ज करावा. या योजनेत लाभार्थींना रोख २० हजार, २५ हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र, ४५०० रूपयांचे संसारउपयोगी साहित्य व ५०० रूपये स्वागत सभांरभ अशी एकूण ५० हजार रूपयांची मदत देवून या जोडप्यांचा सत्कार केला जातो.  
 
Web Title: scheme to promote marriage of handicapped and normal people