Scholarship
Scholarship

शिष्यवृत्ती परीक्षेला भरती-ओहोटी

पुणे - शालेय शिक्षणात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत भरती-ओहोटीचा खेळ सुरू झाला आहे. या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वी चौथी आणि सातवीसाठी होती. ती पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केल्यानंतर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक घटली. याची प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. चौथी आणि सातवीचे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडलेले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे शुल्क परिषदेच्या उपकर निधीतून भरले जात होते; पण पाचवी आणि आठवीचे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडलेले नसल्याने त्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा प्रश्‍न उरला नाही. हे वर्ग खासगी शाळांशी जोडलेले आहेत. शाळा स्तरावर प्रयत्न कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय बोर्डाच्या शाळादेखील या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नसल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कमदेखील वाढविण्यात आलेली नाही. पाचवीसाठी दरमहा शंभर रुपये आणि आठवीसाठी दीडशे रुपये शिष्यवृत्ती मिळते. ही रक्कम दरमहा पाचशे रुपये करावी, असा प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेने गेल्यावर्षी राज्य सरकारकडे पाठविला आहे; परंतु त्यावर अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.

असे आहेत नवे बदल
  उत्तरपत्रिकेवर (ओएमआर शीट) विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक छापील. 
  विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचा ए, बी, सी, डी हा संच कोड रंगवायचा आहे.
  पेपर एकचे पहिले पान निळ्या, तर पेपर दोनचे पहिले पान काळ्या रंगात.
  पेपरचे वितरण चुकीचे होऊन पेपरफुटी होऊ नये म्हणून रंगात बदल.
  दुर्गम भागात ४८ पेक्षा कमी विद्यार्थी असले, तरी तिथे परीक्षा केंद्र असणार 
  शहरी, निमशहरी भागातील परीक्षा केंद्र ४८ ते ९६० विद्यार्थ्यांचे असणार.

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. विभागस्तर, शिक्षणाधिकारी, मुख्यापकांच्या बैठका घेतल्या. यामुळे पाचवीची संख्या वाढली, तरी आठवीची संख्या घटली आहे. माध्यमिक स्तरावर अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे.
- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद

वर्ष         पाचवी                 आठवी
२०१९    ५,१४,२४५              ३,५४,६४१          
२०१८    ४,८८,८८६             ३,७०,२४४
            २५,३५९ (वाढ)       १५,६०३ (घट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com