पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन

Scholarship
Scholarship

पुणे - पीएचडी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा फेलोशिप’ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागे घेतला आहे. आता पीएच.डी. करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने शनिवारी जाहीर केले.

विद्यापीठाने सुरू केलेली विद्यावेतन योजना पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या प्रवेशाच्या तारखेपासून ही योजना लागू असेल. विद्यापीठाने गुणवत्तेच्या आधारे फेलोशिप देण्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. विद्यापीठाच्या या निर्णयाचा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निषेध केला होता. 

विद्यापीठाने गुणवत्तेच्या आधारे विद्यावेतन देण्याच्या निर्णय मागे घ्यावा आणि सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पीएच.डी. करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येणार असून, यासाठी असलेले सर्व नियम पाळावे लागतील. एमफिलच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या आगामी बैठकीत मांडण्यात येईल. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com