नोकरदारांनो, उच्च शिक्षणासाठी मिळणार 30 लाखांची शिष्यवृत्ती...वाचा सविस्तर

Scholarship of Rs 30 lakh for higher education to 100 employees by Suryadatta Education Foundation
Scholarship of Rs 30 lakh for higher education to 100 employees by Suryadatta Education Foundation

पुणे : "सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मॅनेजर स्तराखालील नोकरदारांना १०० टक्के, तर मॅनेजर व त्यावरील नोकरदारांना ५० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट अँड सीएसआर इनिशिएटिव्ह' अंतर्गत ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे," अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सुषमा चोरडिया म्हणाल्या, "नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे दहावे वर्ष असून, गेल्या नऊ वर्षात एक हजार 200 पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी तीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच 22 ते 50 या वयोगटातील असणे आवश्यक आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदरवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन ट्रेड आदी शाखांमध्ये पीजीडीबीएम, पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, पीजीडीएफएस आदी अभ्यासक्रम शिकता येतील. असेही चोरडिया यांनी सांगितले.

या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे 20 जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची पाहणी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी 10 ऑगस्ट नंतर जाहीर होतील. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८९५६९३२४१५/ ८९५६९३२४०५/ ९७६३२६६८२९ यावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com