पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून (२००९-१०) कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत.

पुणे-  ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून (२००९-१०) कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जांमधून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ शिष्यवृत्तीसाठी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा दोघांची निवड करण्यात येणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च २०१९ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (बारावी) ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंचचिकित्सा, वास्तुविशारद किंवा नर्सिंग तसेच विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्‍यक आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या मिळणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०१९ आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी फाउंडेशनतर्फे संपर्क केला जाईल.

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

असा करा अर्ज
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर अर्ज करावेत. अर्जात स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी फोन नंबर, मार्च २०१९ च्या उच्च माध्यमिक परीक्षेतील गुण तसेच पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख करावा. अर्जासोबत गुणपत्रिकेची, उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत तसेच पालक पोलिस खात्यात असल्यासंबंधीचे पत्र जोडावे. 

अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावेत  
  ‘कार्यकारी सचिव,’ सकाळ इंडिया फाउंडेशन, ‘सकाळ ऑफिस’ प्लॉट नं. २७, नरवीर तानाजीवाडी,
  साखर संकुलाजवळ, पीएमटी डेपोजवळ, शिवाजीनगर, 
पुणे - ४११००५.
  अधिक माहितीसाठी संपर्क - (०२०) - ६६२६२३७३
  (सकाळी १०.३० ते ५) सुट्ट्यांचे दिवस वगळून.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarships for the police child