शाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईची सूचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना शालेय परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या बंदीबाबत माहिती द्यावी. तसेच शालेय परिसरात पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केली.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत डॉ. केतकी घाटगे, डॉ. मिलिंद भोई, हसीना मुजावर, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, आशीष येनगंटीवार, डॉ. राहुल मणियार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.

एसटी आणि पीएमपीचे चालक, वाहकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, बचत गट, फेरीवाला संघटनांनाही याबद्दल माहिती द्यावी. गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींचे यासाठी सहकार्य घ्यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Web Title: school area pan center crime