शालेय पुस्तकांचे मोफत वाटप सुरू

samagra Shiksha Abhiyan
samagra Shiksha Abhiyan

पिंपरी - राज्य सरकारच्या ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शहरातील अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तकांच्या वाटपाला बुधवारपासून (ता. २९) सुरवात झाली. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे बालभारतीने सुमारे एक लाख १४ हजार ७९० विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३९ हजार ५९४ पुस्तकांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पुस्तके घेण्यासाठी मुख्याध्यापकांची गर्दी झाली होती.

दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. एकूण सहा प्रभागांचे दोन उन्नत केंद्र आहेत. या केंद्रांच्या अखत्यारीतील शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपरी उन्नत केंद्राअंतर्गत पिंपरी वाघेरे येथील कै. भाऊसाहेब पाटील विद्यालयात व आकुर्डी उन्नत केंद्रातील वसंतदादा प्राथमिक शाळा या दोन उन्नत केंद्रांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या वर्षी ६०० हून अधिक शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.

नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळावीत, असे महापालिकेचे नियोजन होते. त्यानुसार यंदा बालभारतीने पंधरा दिवस अगोदरच पुस्तकांचा पुरवठा केला. पुस्तक आल्यानंतर त्यांच्यावर शिक्का मारणे, त्याचे इयत्तेनुसार गट पाडणे ही कामे तत्काळ केली जाणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलावून विद्यार्थ्यांच्या स्वागताचे नियोजन करणार आहेत. नवी पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मुलांनाही शाळांबाबत गोडी; तसेच इतर मुलांप्रमाणे आपल्या हातातही नवीन कोरी पुस्तके असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे, असे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले.

१ लाख ६३९ - मराठी
३ हजार ५१८ - हिंदी
४ हजार ४४ - उर्दू
५ हजार ५०६ - इंग्रजी
२१ हजार ६२१ - सेमी इंग्रजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com