शाळकरी मुलगा बेपत्ता आझा आहे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

वडगाव मावळ : येथील माळीनगर परिसरातील तेजस महादेव खापे ( वय 15 वर्षे) हा शाळकरी मुलगा गुरुवारी सकाळी साडेदहा पासून राहत्या घरापासून बेपत्ता झाला आहे. 
तेजसचे वडील महादेव दामू खापे ( वय 40 वर्षे, रा. माळीनगर, मुळ रा. पवळेवाडी, ता. मावळ)  यांनी या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस हा गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उन्हाला बसला होता. तेथून तो बेपत्ता झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.टी.गायकवाड पुढील तपास करत आहेत. कोणाला आढळल्यास वडगाव पोलिस ठाण्याशी ( 02114-235333) संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: The school boy is missing from the house